मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल हा त्याच्या आईबरोबर मुंब्राच्या रेती बँड कॉम्प्लेक्समध्ये राहत होता. विशाल हा अल्पवयीन आहे. तो खर्चासाठी त्याची आई उर्मिलाकडे वारंवार पैसे मागत असे. कधी-कधी पैशांवरुन या दोघांमध्ये भांडण व्हायचे. यावेळीही दोघांमध्ये भांडण झाले. आपला मुलगा पैशांसाठी जीव घेईल, अशी शंकाही उर्मिलाला नव्हती. पण भांडणात असं काही झालं की तुम्ही याचा विचारपण करू शकणार नाही.
आईने पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे विशालला राग अनावर झाला आणि त्यांनी आईवर थेट स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. यामध्ये रक्तबंबाळ आईला वेळीच मदत न मिळाल्याने आईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आईचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपी मुलालाही ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times