कुड्डालोर (तामिळनाडू): तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील वडालूर गावात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. येथे एका बस कंडक्टरने एका लष्करातील जवानाच्या पत्नीवर टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी बस कंडक्टरचे लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट होत आहे. पीडित महिलेचे पती सध्या पश्चिम बंगालमध्ये पोस्टिंगला आहेत. पीडितेला दोन अपत्ये असून ती नर्सिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर एका खासगी कंपनीत काम करते.

पीडित महिला कामावर जाण्यासाठी नेहमी खासगी बसने प्रवास करत असे. प्रवासादरम्यान तिची आर. सुंदरमूर्ती नावाच्या कंडक्टरशी तिची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांशी बोलत असत. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी या बस कंडक्टरने पीडितेला प्रपोज केले होते. मात्र, पीडितेला हे आवडले नसल्याने तिने कंडक्टरशी बोलणे बंद केले. दरम्यानच्या काळात कंडक्टरने पीडितेचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने त्याचे काहीही ऐकले नाही. त्यानंतर मात्र चिडलेल्या कंडक्टरने तिचा बदला घेण्याचे ठरवले. हा शुक्रवारी सकाळीच पेट्रोलची बाटली घेऊन बाहेर पीडितेच्या कार्यालयाबाहेर पोहोचला. त्याने पीडितेला बोलण्यासाठी बाहेर बोलावले. पीडिता कार्यालयाबाहेर आल्यानंतर कंडक्टरने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.

त्यानंतर पीडिता मदतीसाठी ओरडू लागली. महिलेचा आरडाओरडा ऐकून बाजूने जाणारे लोक धावून आले आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या आगीत महिलेचे डोके आणि मांड्यांचा भाग जळाला आहे.

पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२० टक्के भाजली महिला

या पीडित महिलेवर कुरिंजीपदी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला कुड्डालोर शासकीय जनरल हस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पीडित महिला २० टक्के भाजल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here