संकटात सापडलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा स्वत:कडं घेतला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा ताबाही अदानींच्या ‘एएचएल’कडं गेला आहे. विमानतळाची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘एएएचएल’नं मुंबईत मुख्यालय थाटलं होतं. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच कंपनीनं आपलं मुख्यालय मुंबईहून गुजरातमध्ये अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा:
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचं महत्त्व जाणीवपूर्वक कमी केलं जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालयं गुजरातमध्ये नेली जात आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच आता ‘एएएचएल’चं मुख्यालय देखील गुजरातमध्ये गेल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत () यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जातं. मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असंच गुजरातला नेलं गेलं,’ असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रानं कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडं होतं. GVK नं मुंबई विमानतळाचं मुख्यालय आंध्रप्रदेशला नेलं नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवलं नाही,’ असा बोचरा टोलाही सावंत यांनी हाणला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times