सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री यांच्या सोबत जयंत पाटील यांनी मंत्रालयात चर्चा केली. यावेळी भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. या सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही मंत्री जयंत पाटील यांनी दिले. या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे व या तालुक्यातील नवीन सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्ती करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चाही बैठकीत करण्यात आली.
वाचा:
सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणलं. या भागात पाणी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असं आश्वासन पाटील यांनी दिलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times