राज्यातील अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी करोना कुटुंब पुनर्वसन समिती असे नेटवर्क तयार झाले आहे. राज्यातील १५० पेक्षा जास्त संस्था त्यात सहभागी झाल्या आहेत. २० जिल्ह्यात या संस्था एकत्रितपणे काम करत आहेत, अशी माहिती निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी दिली. या समितीने राज्यातील १५० पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांनी २० जिल्ह्यातून एकाच दिवशी मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना सुमारे १४०० इमेल्स पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे. विदर्भ,मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व सर्वच भागातून कार्यकर्त्यानी मेल पाठवले आहेत. हिंगोलीतील कष्टकरी महिलांनी यानिमित्ताने मेल करणे शिकून घेतले तर एकट्या नंदुरबार जळगाव मधून २०० पेक्षा जास्त मेल पाठवण्यात आले. गडचिरोलीमधूनही अनेकांनी मेल पाठवले आहेत.
वाचाः
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात आसाम, बिहार, ओरिसा, केरळ, राजस्थान, दिल्ली सरकारने या महिलांना अडीच लाख रुपये रक्कम पेन्शन मुलींच्या लग्नाचा खर्च, शिक्षण अशा विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारने ही या महिलांना मदत करावी पेन्शन सुरू करावे. या महिलांच्या रोजगारासाठी संधी प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. या महिलांचे सासरच्या मालमत्तेवरील अधिकार अबाधित राहण्यासाठी तातडीने आदेश देणे. विविध शासकीय योजना या महिलांना महिन्यासाठी यातील गरजू लाभार्थी शोधून त्या योजना मंजूर कराव्यात. अशा अनेक विविध मागण्या या निवेदनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या मेलमध्ये आसाम सरकारला पीएम केअर मधून अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी जी योजना दिली तशीच योजना महाराष्ट्र सरकारला द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
वाचाः
स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्तांसोबत दोन बैठका घेतल्या. महिला बाल कल्याण विभागाने महिलांसाठीच्या विविध योजनांची संकलित पुस्तिका तयार करण्यासाठी समिती नेमली आहे. या महिलांच्या प्रश्नांसंबंधित विविध मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवले आहेत.त्यानंतर आता सर्व तहसीलदारांना निवेदने देण्यात आली. अकोले येथे करोनाने पती गमावलेल्या कांचन शिंदे या महिलेच्या हस्ते निवेदन दिले. यावेळी अशा कुटुंबातील २० सदस्य उपस्थित होते. तालुक्यातील अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते यावेळी आले होते. तहसीलदारांनी गुरुवारी आदिवासी विभाग, गटविकास अधिकारी व सर्व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्याचे सांगितले. यावेळी शिवाजी नेहे, मनोज गायकवाड, वसंत मनकर, बाळासाहेब मालुंजकर, शांताराम गजे, प्रमोद मंडलिक, श्रीरंग भाटे, मिलिंद रुपवते, राणी कोळपकर, श्रीनिवास रेणूकादास, सुभान शेख, प्रकाश साळवे उपस्थित होते.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times