डोंबिवलीतील गांधीनगर नाल्यातून सांडपाणी हिरव्या रंगाचे असल्याने पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या हिरव्याजर्द नाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर नाल्याच्या बाजूला असलेल्या रायबो फॅम या खाद्यरंग बनवणाऱ्या कंपनीतून हे सांडपाणी नाल्यात सोडण्यात आल्याचं आढळून आले होते.
नाल्यात प्रदूषित पाणी सोडल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंचं आभार मानले आहेत. ‘डोंबिवलीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नियंत्रण बोर्ड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा,’ असं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आल्याने केमिकेलचे पाणी नाल्यात सोडण्याचा प्रकार थांबल्यानंतरचा नाल्यातील पाण्यात झालेल्या बदलाचा व्हिडिओ ट्वीटद्वारे शेअर केला आहे. डोंबिवली गांधी नगर नाल्यात संभाव्य घातक सांडपाण्याची बातमी पाहताच एमपीसीबीने सदर कंपनीवर त्वरित कडक कार्यवाही केली आहे. महाराष्ट्राची पावन भूमी आम्ही प्रदूषित होऊ देणार नाही आणि प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली जातील, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times