मिळतात. सध्या किसान विकास पत्रावर ७.६ टक्के निश्चित परतावा आहे. शिवाय कर बचतीचा लाभ मिळतो. तर जाणून घेऊया किसान विकास पत्रातील गुंतवणूक कशी करावी.
या योजनेत परतावा किती – केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांमध्ये किसान विकास पत्राचा समावेश होतो. सरकारने जानेवारी ते मार्च या तिमाहीत अल्प बचत योजनांचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. सध्या किसान विकास पत्रावर ७.६ टक्के परतावा आहे. जर किसान विकास पत्रात ११३ महिने गुंतवणूक केली तर गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होते.
गुंतवणूक मर्यादा – भारतीय टपाल खात्याच्या माहितीनुसार किसान विकास पत्रात किमान एक हजारांची गुंतवणूक करता येते. त्यानंतर १०० रुपयांच्या टप्प्यात यात गुंतवणूक करता येते. कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला किसान विकास पत्रे हस्तांतर करता येतात. तसंच एका टपाल कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात देखील किसान विकास पत्रे हस्तांतर करण्याची सुविधा आहे.
किसान विकास पत्रे कुठे मिळतील– किसान विकास पत्रे टपाल कार्यालयात मिळतात. यात गुंतवणूकदार वारस नेमू शकतो.
किमान गुंतवणूक कालावधी– किसान विकास पत्रात किमान अडीच वर्षे गुंतवणूक केल्यानंतर पैसे काढण्याची सुविधा आहे.अडीच वर्षानंतर किसान विकास पत्रांची विक्री करून पैसे काढता येतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times