मुंबई: शिवसेनेच्या या मुखपत्रातील अग्रलेखात पक्षावर भाष्य करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, असे सांगतानाच पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय?, असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामना या मुखपत्रावर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, कारण सामना मी वाचत नाही, अशा शब्दात पटोले यांनी टोला लगावला आहे. (i do not read news paper says leader )

एका वृत्तवाहिनीशी बोलतना पटोले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामना या मुखपत्रावर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, कारण मी सामना वाचत नाही. कोणी काय टीका करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार एकदा करावा लागेल, असा इशारा पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शिवेसेना दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘गांधी कुटुंबावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकणे’

पटोले पुढे म्हणाले की, आम्हाला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी कुटुंबावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखेच आहे. जो थुंकेल त्याच्यावरच ती पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही पटोले यांनी पुढे म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

काय म्हटले आहे अग्रलेखात?
सामनाच्या अग्रलेखात ‘जी-२३’ चा उल्लेख करत काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुसीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काँग्रेसमधील धुसफुशीमागे संघ परिवार असावा असे राहुल गांधी यांचे मत असू शकते, असे सांगतानाच काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे आणि त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

प्रियंका गांधी या दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात गेल्या तेव्हा लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्या भोवतीही गर्दीचा माहोल बनतो, पण या संघर्षात सातत्य हवे. राजकारणात प्रवाह थांबला तर डबके होते हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

क्लिक करा आणि वाचा-

‘तो काँग्रेसपक्ष आज उरलेला नाही’
स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस नेत्यांनी छातीवर गोळ्या झेलल्याचा उल्लेख तरत काँग्रेस पक्ष हिंमतवाला होता, डरपोक नव्हता असे अग्रलेखात म्हटले आहे. देशभक्तिशी त्यांचे अतूट नाते तेव्हा होतेच, पण तो काँग्रेस पक्ष आज उरलेला नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here