मुंबई : प्रकरणात अटकेत असलेल्या उद्योगपती प्रकरणी (Raj Kundra News Today) ब्रांचने पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसंच राज कुंद्रा यांची कंपनी तरुणींना फसवून त्यांच्याकडून अश्लील व्हिडिओ बनवत असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

‘पॉर्नोग्राफिक कंटेण्टप्रकरणी क्राईम ब्रांचने फेब्रुवारी २०२१ मध्ये मालवणी पोलिस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासात अनेक गोष्टी उघड झाला. सिनेमात काम करणाऱ्या नवोदित महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये ब्रेक देऊ, असं आमिष दाखवून ऑडिशन्ससाठी बोलावलं जायचं. बोल्ड सीन्स करावे लागतील, असं सुरुवातीला सांगितलं जायचं आणि नंतर याचं पर्यावसन सेमी न्यूड आणि नंतर न्यूड सीनमध्ये व्हायचं. याला महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या आणि अशाच काही महिला कलाकारांनी क्राईम ब्रांचकडे येऊन तक्रार केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला,’ अशी माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

राज कुंद्राची कंपनी नेमकं कसं करत असे काम?
‘क्राईम ब्रांचने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना असताना असं दिसलं की महिला कलाकारांकडून तयार केलेल्या क्लिप्स आणि व्हिडिओ काही अ‍ॅप्स आणि वेबसाईट्सना विकल्या जात होत्या. याप्रकरणी आधीच आपण काही आरोपींना अटक केली आहे. यातील उमेश कामत नावाचा व्यक्ती हा व्यावसायिक राज कुंद्रा यांच्या कंपनीचे भारतातील व्यवहार पाहायचा. राज कुंद्रा यांच्या व्हिआन या कंपनीचं केनरीन नावाच्या कंपनीशी साटंलोटं होतं. ही केनरीन कंपनीही कुंद्रा यांच्या नातेवाईकाचीच होती. केनरीन कंपनी जरी लंडनस्थित असली तरी या कंपनीचं अकाऊंटिंग आणि कंटेण्ट तयार करण्याचं काम राज कुंद्राच्या व्हिआन कंपनीच्या ऑफिसमधूनच होत असे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘याप्रकरणी तपास करत असताना सर्व धागेदोरे सापडले आहेत. राज कुंद्रा यांच्या कंपनीच्या ऑफिसमधून सर्व चित्रफिती हाती लागल्या आहेत. त्यामुळे तपासानंतर राज कुंद्रा यांना आपण अटक केली आहे. हॉट शॉट्स या अ‍ॅपच्या माध्यमातून हा अश्लील कंटेण्ट विकला जात असे. मात्र याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अ‍ॅपल प्ले स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरने हे हॉट शॉट्स नावाचं अ‍ॅप काढून टाकलं होतं,’ असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत हाती लागलेल्या विविध पुराव्यांच्या आधारे मुंबई क्राईम ब्रांचकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here