अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिनेडने हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एमआयएएल) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील (एनएमआयएएल) मुख्यालये मुंबईतच राहतील, असे अदानी समूहाने स्पष्ट केले आहे. याच ठिकाणी ही मुख्यालये ठेवून इथेच हजारो नोकरीच्या संधी निर्माण करून मुंबईला अभिमानास्पद होईल अशी कामगिरी आम्ही करण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही पुनरुच्चार करत असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
आर्थिक संकटात सापडलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा स्वत:कडे घेतला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित ताबाही ‘एएचएल’कडे गेला आहे. विमानतळाची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘एएएचएल’ने आपले मुख्यालय मुंबईत सुरू केले होते. त्यानंतर खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीने आपले मुख्यालय गुजरातमध्ये अहमदाबादला हलवले अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र ही अफवा असल्याचे सांगत मुंबईतला उद्योग गुजरातला जात असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- मनसेने दिला होता इशारा
कंपनीचे मुख्यालय गुजरातला हलवले जाणार अशा बातम्या प्रसारित झाल्यानंतर मनसेने याबाबत भूमिका जाहीर केली होती. मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी या संदर्भात एक ट्वीट केले होते. ‘विमानतळाचे फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेले आहे. मात्र, विमानतळ मुंबईमध्येच आहे. आम्हाला डिवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल…,’ असा इशारा सरदेसाई यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला होता. मात्र आता कंपनीनेच खुलासा केल्यामुळे आता कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट होत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेसनेही सोडले होते टीकास्त्र
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालये गुजरातमध्ये हलवली जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. मुख्यालय गुजरातला हलवणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times