आजच्या १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ९११ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार ५९३ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ०४२ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १२ हजार ५४९ इतके रुग्ण आहेत. तर, सांगलीत ही संख्या १० हजार ८४९ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १० हजार ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, कोल्हापुरात ही संख्या १० हजार १०० इतकी आहे. साताऱ्यात ही संख्या ६ हजार ७७६, अहमदनगरमध्ये ३ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये २ हजार ७२७, रत्नागिरीत २ हजार ८७४, सिंधुदुर्गात २ हजार ४९९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १९७ इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ६८१ इतकी झाली आहे.
यवतमाळमध्ये फक्त १५ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६२२, नांदेडमध्ये ही संख्या ४५३ इतकी आहे. जळगावमध्ये ४३९, तसेच अमरावतीत ही संख्या १५० इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १५ इतकी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times