वाचा:
मोहिमेतंर्गत सध्या लसीकरण सुरू आहे. मात्र पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या बुधवार दिनांक २१ जुलै रोजी लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येत असते. त्याप्रमाणे लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचा:
दरम्यान, लसीकरण मोहिमेवर सध्या पूर्णपणे केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. केंद्र सरकारकडून लस पुरवठा होत असल्याने त्यावर लसीकरण विसंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरेशा प्रमाणात होत नसल्याने लसीकरणात सातत्याने अडथळे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत याआधीही पुरेशा लस नसल्याने लसीकरणाला ब्रेक द्यावा लागलेला आहे. बीकेसी येथील लसीकरण केंद्रावरही आज काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. नोंदणीशिवाय लसीकरण होत असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनीच थांबावे आणि बाकीच्या नागरिकांनी माघारी जावे असे जाहीर करण्यात आल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक तास थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिकांची कोंडीही झाली आहे. काहींना दुसऱ्या डोसची मुदत संपून लस मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times