दरड कोसळल्याने शिर्के वाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला होता. आसूद ग्रामपंचायतीने जेसीबी लावून हा मार्ग मोकळा केला.
तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत तब्बल २०१.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त ३ घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
नुकसान झालेल्या ३ कुटुंबांनी सध्या शिर्के वाडी येथील नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. पंचनाम्यानंतर एकूण ५० हजार रुपये नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं. सुवर्णा सुरेश माने यांच्या कुटुंबाचं २५ हजार रुपयांचं नुकसान झालं, तर कल्पेश गोविंद माने यांचं २० हजार रुपये आणि हरिश्चंद्र शंकर माने यांचं ५ हजार रुपये नुकसान झालं आहे.
दरम्यान, कल्पेश माने, संतोष माने, हरिश्चंद्र माने यांच्या घराच्या भिंतींना भेगा गेल्या आहेत. त्यामुळे घरांना धोका निर्माण झाल्याने सदर कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. आसूद रेवाळे वाडीतील जि. प.शाळा येथे स्थलांतरण करण्यासाठीची प्रक्रिया तालुका प्रशासनाकडून सुरू झाली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times