पाटणाः केंद्र सरकारमधील सत्ताधारी भाजप पाठिंबा काढण्याचं आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( ) यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( ) यांना केलं होतं. यावरून नितीश कुमार यांना प्रश्न करण्यात आला. नितीशकुमार यांनी संजय राऊतांचं आवाहन धुकावून लावत तिखट प्रतिक्रिया दिली.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन धोरण आखले आहे. या धोरणाला नितीशकुमार यांचा विरोध आहे. यामुळे नितीशकुमार यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असं संजय राऊत यांनी ‘सामना’मधील लेखात म्हटलं होतं.

नितीशकुमार यांचा जनता दरबार संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना रोखलं आणि संजय राऊत यांच्या आवाहनावर प्रश्न विचारण्यात आला. अशा नेत्यांच्या म्हणण्याकडे फार लक्ष द्यायचं नाही, अशी बोचरी प्रतिक्रीया नितीशकुमार यांनी दिली.

संजय राऊत आणि त्यांचा पक्ष आधी कुणासोबत होता आणि आता कुणासोबत आहे, हे सर्वांना दिसतंय. यामुळे अशा नेत्यांच्या म्हणण्याकडे मी लक्ष देत नाही, असं नितीशकुमार म्हणाले. शिवसेनेची आधी महाराष्ट्रात भाजपसोबत युती होती. पण ही युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मुंबईत मृत्यू झाला. त्यावेळी संजय राऊत यांनी काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. यामुळे संजय राऊतांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे मी ढुंकूनही बघत नाही, असा टोला नितीशकुमारांनी लगावला.

देशातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी फक्त कायदा करून उपयोग नाही. महिलांना शिक्षित करणं हा त्यावर मोठा उपाय आहे, याचा पुनरुच्चार नितीशकुमार यांनी केला. माझ्याकेड यासंबंधी बिहारचा डाटा आहे. यानुसार महिलांच्या शिक्षण हाच लोकसंख्या नियंत्रणाचा एकमेव मार्ग आहे, असं नितीशकुमार यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here