नवी दिल्लीः केंद्र सरकार करोना महामारीच्या व्यवस्थापनात पूर्ण अपयशी ठरले, असा आरोप विरोधी पक्षांनी करोनावरील चर्चेदरम्यान केला. समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आणि आरोग्य मंत्र्यांना त्यांनी बळीचा बकरा ( ) केला, असा आरोप काँग्रेस नेते ( ) यांनी केला.

सरकारने करोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत लपवाछपवी( ) केली, असा आरोप विरोधी पक्षांनी राज्यसभेत केला. अर्थव्यवस्थेचा पाया बळकट केल्याने आणि अनेक मुद्द्यावर पावलं उचलण्यात आल्याने देश करोना महामारीच्या संकटातही भक्कमपणे उभा आहे, असा दावा सरकारने केला.

नोटबंदी प्रमाणेच लॉकडाउनची घोषणाही रात्री करण्यात आली. २४ मार्चच्या रात्री लॉकडाउन घोषित करण्यात आला. यामुळे स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न बिकट बनला. लॉकडाउनची व्यवस्था ८ ते १५ दिवस आधी करायला हवी होती. तसंच स्थलांतरीत मजुरांना पोहोचवण्याची व्यवस्थाही करायला हवी होती. ही जबाबदारी सरकारची होती. पण यात सरकार अपयशी ठरले, असा आरोप खर्गे यांनी केला. पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये निवडणुका घेऊन केंद्र सरकारने करोना संबंधी बनवलेल्या आपल्याच नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप खर्गेंनी केला.

‘पंतप्रधान मोदी स्वतःवर दोष घेत नाही, इतरांना बळीचा बकरा बनवतात’

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर नागरिकांनी थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, स्वतः घरात कोंडलं, पण सरकारने त्यांचा विश्वासघात केला. धोखा दिला. आरोग्य मंत्र्यांना त्यांनी बळीचा बकरा केले. पंतप्रधान मोदी आपल्यावर कुठलाही दोष घेत नाहीत. इतरांना ते बळीचा बकरा बनवतात, अशी टीका खर्गेंनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here