मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली होती. त्यानंतर देशमुख आणि राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक होईल असे बोलले जात आहे. खरे तर ही मालमत्ता सुमारे ३०० कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. मात्र या संपत्तीचे किंमत केवळ २ कोटी ६० लाख रुपये असल्याचे खुद्द अनिल देशमुख यांनी स्पष्ट करत ३०० कोटींची गोष्ट ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ईडीने जे समन्स आपल्याला बजावले आहेत त्याचे उत्तर आपण ईडीला दिले असल्याचे देखमुख यांनी सांगितले आहे. आरण ईडीच्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असल्याचेही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निर्णय दिल्यानंतरच आपण ईडीसमोर हजर होऊ, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वाडविहिरा येथील घरांवर छापे टाकले होते. गेल्या महिन्यात देखील देशमुख यांच्या मुंबईतील आणि नागपूरमधील ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यानंतर चौकशीसाठी त्यांचे मुंबईतील एक घर आणि रायगड जिल्ह्यातील जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times