: राजापूर परिसरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे राजापूर नगरपरिषदने भोंगा वाजवून नागरिकांना याबाबत इशारा दिला आहे.

काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने नदीजवळील सर्व व्यावसायिकांना सुरक्षित जागी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मंगळवारीही सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारनंतर पुन्हा एकदा कोसळण्यास सुरुवात केली. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलीमीटरच्या सरासरीचा आकडा गाठला आहे. अजून जुलै महिन्याचे १० दिवस बाकी असताना १ जूनपासून २० जुलैपर्यंत पावसानं १९३९ मिलीमीटरचा टप्पा गाठला आहे.

मागील २४ तासातही रत्नागिरी जिल्ह्यात १०२ मिलीमीटर इतका पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात १ जूनपासून २० जुलैपर्यंत १२६५ मिलीमीटर एवढाच पाऊस झाला होता. मात्र यावर्षी पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. त्यातच पुढील दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. मंगळवारी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

दरम्यान, कोकणातील इतर जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढलं आहे. पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर पुढील काही दिवस नदीच्या बाजूला राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here