नांदुरा खुर्द शेतशिवारातील एका शेतात पिकाला खत टाकण्यासाठी ही शाळकरी मुले गेली होती. काम संपवून घरी परत येत असताना त्यांना पाण्याने भरलेल्या शेततळ्यात पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर दोघांनी शेततळ्यात सरळ उडी घेतली.
शेततळ्यात साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने ते दोघेही चिखलात रुतून बसले. उडी घेतलेली दोन्ही मुले पाण्याच्या बाहेर न आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी या घटनेची माहिती नांदुरा खुर्द येथील ग्रामस्थांना दिली.
ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेत शेततळ्यातून मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील यांनी बाभूळगाव पोलिस ठाण्याला देणे अपेक्षित होते. मात्र, घटना घडून अनेक तास उलटल्यानंतरही या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. घटनेसंदर्भातील व्हिडिओ सामाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times