वाचा:
मानाच्या १० पालखी पादुकांसह पौर्णिमेला विठ्ठलाच्या भेटीला येतात. यावेळी पालखी सोबतच्या वारकऱ्यांना देवाचे दर्शन देण्याची प्रथा आहे. मात्र या वारकऱ्यांना नेमका कोणी निरोप दिला हे समजले नसले तरी शेकडो वारकरी अचानक मंदिराजवळ आल्याने प्रशासन गोंधळात पडले. अखेर मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, प्रांताधिकारी सचिन ढोले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, संत सोहळा प्रमुख संजय मोरे आणि इतर मान्यवरांशी चर्चा केल्यावर तोडगा निघाला. प्रशासन शासनाशी चर्चा करून निर्णय कळवणार असल्याचे माऊली पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी सांगितले. यानंतर मात्र पालखी सोहळ्यातील जमलेले सर्व वारकरी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून विठ्ठलाचा जयघोष करीत मठांमध्ये परतले आणि तणावही निवळला.
वाचा:
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरू दे…
करोना संकटामुळे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी झाली नाही. पंढरीत मानाच्या पालख्या आणि मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला. संचारबंदीमुळे पंढरपूर आणि परिसरात पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी पंढरीत आषाढीला शुकशुकाट पाहायला मिळाला. सलग दोन वर्षे आषाढी यात्रा करोनाच्या सावटाखाली साधेपणाने पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी ‘पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरू दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे. यासाठी देवा आता करोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे’, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी बा विठ्ठलचरणी घातलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times