नवी दिल्लीः करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी ( ) देशात एकही मृत्यू झालेला नाही, असं दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं ( ) आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत माहिती दिली. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ( ) ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसच्या के. सी. वेणुगोपाल यांनी केला.

ऑक्सिजन अभावी फक्त दिल्लीतच नाही तर प्रत्येक राज्यात करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सभागृहाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात आपण सभागृहा हक्कभंगाचा ठरावू आणू. त्यांनी चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे, असं के. सी. वेणुगोपाल म्हणाले.

करोनासंबंधी आकड्यांशी छेडछाड करण्यासाठी केंद्राने कुठल्याही राज्यावर दबाव आणला नाही. राज्याकडून दिली जाणारी माहिती गोळा करण्याचे आणि ते जाहीर करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. आम्ही कुठल्याही राज्याला डेटासोबत छेडछाड करण्यास सांगितले नाही. असं करण्याचं कुठलंही कारण नाही. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा मांडला होता, असं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

रस्त्यांवर आणि हॉस्पिटल्समध्ये मोठ्या संख्येत करोना रुग्णांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी ही परिस्थिती निर्माण झाली, असं म्हणत काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सरकारला प्रश्न केला. त्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री उत्तर दिलं.

केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदतः डॉ. भारती पवार

आरोग्य व्यवस्था हा राज्यांचा विषय आहे. तरीही केंद्र सरकारने राज्यांना भरपूर मदत केली. सर्व राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला. करोनाच्या पहिल्या लाटेत रोज ३०९५ मेट्रीक ट ऑक्सिजनची गरज पडत होती. पण दुसऱ्या लाटेत ही ९००० मेट्रीक टनची आवश्यकता निर्माण झाली. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य नियोजन केले होते, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री?

देशात करोनाची तिसरी लाट येऊ देणार नाही, असा संकल्प १३० कोटी जनतेसह सर्व राज्यांनी सोडला पाहिजे. आपला संकल्प आणि पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आपण वाचू शकतो. अशा परिस्थितीत एकजूट होऊन काम केलं पाहिजे. तुम्ही काम केले की नाही? असं केंद्र सरकारने कुठल्याच राज्याला विचारलं नाही. आम्हाला या मुद्द्यावरून राजकारण करायचे नाही. सरकारला प्रत्येक महिन्याला सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे ११ ते १२ कोटी डोस उपलब्ध होत आहेत, अशी माहिती मनसुख मांडवीय यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here