नवी दिल्लीः देश करोना महामारीच्या संकटाचा सामना करत असताना आणखी एक वाईट बातमी ( ) समोर आली आहे. भारतात H5N1 एवियन इन्फ्लुएंजा म्हणजे बर्ड फ्लूने पहिल्या मृत्युची नोंद झाली आहे. बर्ड फ्लूने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यानंतर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या दिल्ली एम्समधील सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून आयसोलेट करण्यात आलं आहे.

देशात अजूनही करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्ये झिका व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. केरळमध्ये आतापर्यंत झिका व्हायरसचे ३९ रुग्ण समोर आले आहे. आता बर्ड फ्लुमुळे एका मुलाच्या झालेल्या मृत्युने सरकार समोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here