कोलंबो : भारतीय संघाने श्रीलंकेला दुसऱ्या वनडे सामन्यात पराभूत करत इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जो पराक्रम केला आहे, तो आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणालाही करता आलेला नाही.

भारतीय संघाने कोणता पराक्रम केला, पाहा…भारतीय संघाने या सामन्यात विजयासह मालिका तर जिंकलीच आहे, पण त्याचबरोबर एक इतिहास रचला आहे. कारण आतापर्यंत वनडे सामन्यात एखाद्या संघाला सर्वात जास्त वेळा पराभूत करण्याची किमया भारतीय संघाने साधली आहे. कारण भारतीय संघाने आता श्रीलंकेवर सर्वाधिकवेळा विजय मिळवला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तान आणइ ऑस्ट्रेलिया यांच्या नावावर होता. आतापर्यंत पाकिस्तानने श्रीलंकेला वनडे क्रिकेटमध्ये ९२ वेळा पराभूत केले आहे, गेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक ९२ वेळा न्यूझीलंडला वनडे क्रिकेटमध्ये पराभूत केले आहे. पण भारताने आता या दोघांचा विक्रम मोडीत काढला आणि ९३ वेळी श्रीलंकेवर विजय मिळवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या संघावर सर्वात जास्त विजय मिळवण्याचा मान आता भारतीय संघाने पटकावला आहे.

श्रीलंकेने या सामन्यात भातीय संघापुढे विजयासाठी २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पण दीपक चहरने अर्धशतक झळकावत भारताला सामना जिंकवून दिला. भारतीय संघ हा सामना हरणार, असे काही जणांना वाटत होते. पण चहरच्या अर्धशतकाने संघात संजीवनी आणली आणि संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या विजयासाह भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. चहरने या सामन्यात सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६९ धावा फटकावल्या आणि भारतीय संघाच्या विजयावर शिक्कानोर्तब केले. चहरचे हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे. चहरने या सामन्यात फलंदाजीबरोबर चांगील गोलंदाजीही केली. त्यामुळ दीपक चहरला यावेळी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here