लसीकरण मोहीमेत सुरवातीचे १० कोटी डोस देण्यास ८५ दिवस लागले. पण अखेरचे १० कोटी डोस देण्यासाठी फक्त २ दिवस लागले. ६ महिन्यांनंतरही अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही, यावर चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी लसीकरण मोहीम नियोजनबद्ध प्रकारे सुरू ठेवण्यावर भर दिला.
पंतप्रधान मोदींनी करोनाच्या संकटात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आतापर्यंत २० वेळा बैठक केली आहे. तर आरोग्य मंत्र्यांनी २९ वेळा बैठका घेतल्या आहेत. फक्त ८ राज्यांमध्ये १०-१० हजारांहून अधिक करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर फक्त ५ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांहून अधिक आहे. जगात सर्वाधिक लसीकरण हे भारतात झाले आहे, अशी माहिती आरोग्य सचिवांनी प्रेजेंटेशनवेळी दिली.
पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कौतुक केले. विविध पक्षांच्या नेत्यांनी आपला अनुभव बैठकी मांडला. तर बीजेडीने लसीकरण मोहीम ९० टक्के राज्य सरकारांच्या नियंत्रणात देण्याची मागणी केली. तर अनेक पक्षांनी भारतात विकसित केलेल्या लसींना जागतिक स्तरावर मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्नन करण्याची मागणी केली. महाराष्ट्र आणि बंगालने लसीच्या डोसच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times