काळात अनाथ झालेल्या राज्यातील ४५० मुलांसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेतून अनाथ मुलांना प्रेमाचा आधार दिला जाणार आहे. योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील ४५० सहकारी प्रत्येकी एका कुटुंबातील मुलांशी जोडले जाणार आहेत. अनाथ मुलींची जबाबदारी पक्षातील महिला, युवती तर मुलांची जबाबदारी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता घेणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
वाचा:
ही योजना राबवण्यासाठी पक्षानं ‘राष्ट्रवादी दूत’ तयार केले आहेत. हे दूत ४५० अनाथ मुलांच्या घरात जातील. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाला देतील. शिवाय, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडं उपलब्ध असलेली या अनाथ मुलांची माहिती जमा केली जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम हाती घेतला जाईल. संपूर्ण उपक्रमाची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाइटवर व माझ्या फेसबुक पेजवर उपलब्ध असेल, असंही सुळे यांनी सांगितलं.
‘अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी भरून काढण्याचं ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून करण्याचा प्रयत्न आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. या योजनेत सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times