पिंपरी-चिंचवड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. लॉकडाउनला आता जनता पुरती कंटाळली आहे. अनेक ठिकाणी मुक्तपणे वावरता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी लोकल बंद असल्यानं हजारो लोकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. छोट्या उद्योगधंदेही ठप्प आहेत. शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होत आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर लॉकडाउन हळूहळू उठेल, अशी आशा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं सरकारनं पूर्ण लॉकडाउन उठवणं टाळलं आहे.
वाचा:
या पार्श्वभूमीवर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. काही जणांना वाटतं पुढचे १०० ते १२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळं या दिवसांत करोना नियमांचं काटेकोर पालन व्हायला हवं. अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसतात. अशी बेफिकिरी योग्य नाही,’ असं ते म्हणाले.
वाचा:
‘केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या प्रमाणात कोविड लस मिळायला हवी. मात्र, तसं होताना दिसत नाही. लस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ‘पूर्वी लोक लस घ्यायला घाबरत होते. आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची मानसिकता बदलली आहे. ही सकारात्मक बाब आहे, असंही ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times