काही दिवसांपूर्वी दोषी विनय शर्मान तुरुंगात भिंतीवर डोकं आपटलं होतं. यानंतर विनयच्या वकिलाने कोर्टात याचिका दाखल केली. विनय प्रचंड तणावाखाली आहे आणि त्याला उच्चस्तरीय वैद्यकीय उपचारांची गरज आहे, अशी मागणी विनयच्या वकिलाने याचिकेतून केली. या प्रकरणी दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टात आज सुनावणी झाली.
निर्भया प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे. फाशीच्या शिक्षेमुळे दोषींची मानसिक स्थिती बदलू शकते. दोषी तणावाखाली येणं साहजिकच आहे. तसंच दोषी विनयला आवश्यक आणि पुरेसे वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. यामुळे त्याची याचिका फेटाळण्यात येत आहे, असं कोर्टाने याचिकेवर निकाल देताना स्पष्ट केलं.
शिक्षेत अडकाठी आणण्याचा प्रयत्नः निर्भायाची आई
विनय शर्माची याचिका म्हणजे शिक्षेत आणखी विलंब करण्याचा प्रयत्न आहे. सर्व कायदेशीर मार्ग वापरून ते पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यश येणार नाही. निर्यभयाच्या दोषींना आता ३ मार्चला फाशी होणारच असा मला विश्वास आहे, असं निर्भयाची आई आशा देवी यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times