इस्रायली वृत्तपत्र हारित्झने दिलेल्या वृत्तानुसार, नेतन्याहू सरकार इतर देशांच्या सरकारांवर पेगासस सॉफ्टवेअर घेण्यासाठी जोर देत होते. इतकंच नव्हे तर एनएसओला संकोच वाटू लागल्यास इस्रायली सरकार त्यांच्यावतीने चर्चा करायची. वृत्तपत्राने अनेक सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान ‘सायबर शस्त्रे’, विशेषत: एनएसओचे जोरदार समर्थन करत होते.
वाचा:
नेतन्याहू यांनी एखाद्या देशाचा गुप्त दौरा केला तरी त्यांच्यासोबत एनएसओ ग्रुपचे प्रतिनिधी असायचे. नेतन्याहू यांच्या सूचनेनुसारच सौदी अरेबियाला ‘सायबर शस्त्रे’ देण्यात आले होते. एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल वर्ष २०१७ मध्ये असे मानत होता की, सौदी अरेबिया हा हेरगिरी सॉफ्टवेअरच्या मार्केटिंगसाठी एक रणनीतिक लक्ष्य आहे. सौदी अरेबिया हा अरब जगतातील उदारमतवादी शक्ती असल्याचे इस्रालयला वाटत होते आणि इराणसोबत तणाव वाढवण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. इराणसोबत सौदी आणि इस्रायलचे तणावपूर्ण संबंध आहेत.
वाचा:
सूत्रांनी सांगितले की, या प्रकल्पात संरक्षण मंत्रालयदेखील होते. सौदी अरेबियाला आपले तंत्रज्ञान घेण्यासाठी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यामुळेच पेगाससच्या एनएसओ ग्रुप आणि सेलेब्राइट समूहाला सौदी अरेबियातून मोठे कंत्राट मिळाले. सेलेब्राइट ही कंपनी फोनमधील सुरक्षेला भेदून त्यातील माहिती काढण्यासाठी चर्चेत असते. या समूहाला सौदी पोलिसांकडून मोठे कंत्राट मिळाल्याची चर्चा होती.
नेतन्याहू यांचा भारत दौरा व पेगासस
एका अधिकाऱ्यांने सांगितले की, इस्रायस सायबर शस्त्रांद्वारे सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांसोबतचे संबंध सामान्य करण्यासाठी प्रयत्न करत होता. आयफोनला काहीही न करता पेगाससद्वारे हॅक केले जाऊ शकते हे इस्रायली अधिकाऱ्याने सौदीच्या अधिकाऱ्याला दाखवून दिले. सौदी अरेबियाने एनएसओ सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी दरवर्षी पाच कोटी डॉलर देण्याचा करार केला असल्याचे म्हटले जाते.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे भारत दौऱ्यावर आले होते. भारत आणि इस्रायल दरम्यान काही करारही झाले होत. नेतन्याहू यांच्या भारत दौऱ्यानंतर पेगासस स्पायवेअरचा वापर सुरू झाला असल्याचे म्हटले जाते. भारतात विरोधी पक्ष नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन पेगाससने हॅक केले असल्याचा खुलासा काही वृत्तसंस्थानी केलेल्या शोधपत्रकारितेत करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times