मुंबई : छोट्या पडद्यावर ” या मालिकेची कमालीची चर्चा आहे. या मालिकेत जिजाऊ यांची भूमिका कोण साकारणार याविषयीही उत्सुकता होती. पण आता प्रतीक्षा संपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री निशिगंधा वाड साकारणार आहेत.
निशिगंधा या स्वत: इतिहासाच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे जिजाऊ साकारणं हा अत्यंत सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय. ‘पालनकृत, ताठ कण्याच्या, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आह. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा दैवी योग आहे’; असं त्या म्हणाल्या.
जवळपास दहा वर्षांनंतर त्या मराठी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. मराठी मालिकाविश्वात पुन्हा काम करण्यासाठी त्या उत्सुक आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times