‘लिवा मिस दिवा २०२०’ चं हे आठवं वर्ष असून या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून सौंदर्यवतींची निवड करण्यात येते. यासाठी ११ राज्यांमध्ये या स्पर्धेच्या ऑडिशन्स पार पडले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धेचं बिगुल वाजलं होतं. यावेळी २००० सालची मिस युनिव्हर्स व अभिनेत्री लारा दत्ता आणि नुकतीच मिस दिवा युनिव्हर्सचा किताब मिळवलेली वर्तिका सिंग या दोघीही हजर होत्या. ऑडिशनमधून निवड झालेल्या तरुणींना अभिनेत्री लारा दत्ता हिनं मार्गदर्शन केलं आहे.
इंडस्ट्रीमध्ये येण्यास उत्सुक असणाऱ्या तरुणींना ‘लिवा मिस दिवा २०२०’ ही सौंदर्य स्पर्ध व्यासपीठ उपलब्ध करुन देईल. याद्वारे भारतीय तरुणींचं मनमोहक सौंदर्य आणि प्रतिभा जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘मिस दिवा’ या स्पर्धेत विजेती ठरलेली सौंदर्यवती जागतिक पातळीवरील ‘मिस युनिव्हर्स २०२०’ आणि ‘लिवा मिस दिवा सुप्रानॅशनल २०२०’मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल. तसंच विजेत्या सौंदर्यवतीला दहा लाख रुपयांचा बक्षीस मिळणार आहे. देशभरातील ११ शहरांमध्ये ऑडिशन झाल्यावर फेब्रुवारी महिन्यात मुंबईत या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times