पुणे: भाजपचे आमदार यांनी महाविकास आघाडी सरकारवर राज्यातील विविध प्रश्नांचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. राज्याची सध्याची अवस्था ही ‘राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, अशी असल्याचे सांगत शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला राज्यातील विविध प्रश्नांचा उल्लेख करत घेरण्याचा प्रयत्न केला. ( criticizes maha vikas aghadi govt on various issues in state)

शेलार पुण्यात प्रत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडताना शेलार यांनी राज्याला भेडसावणाऱ्या प्रश्नावर प्रकाश टाकला. राज्यात शेतकरी अडचणीत असून, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, पाऊस, पुर, कोरोना, लाँकडाऊन, अडचणीत आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी, मराठा, ओबीसी आरक्षण असे राज्यासमोर शेकडो प्रश्न आ वासून उभे आहेत, असे सांगतानाच सरकार मात्र या विषयावर चर्चा करायला तयार नाही. राज्यात संध्या है दुर्दैवी चित्र दिसत असल्याचेही शेलार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला. महाविकास आघाडी नेत्यांमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ एकच चर्चा असते आणि ती म्हणजे ‘ आम्ही स्वबळावर लढणार.. आम्ही स्वबळावर लढणार..’ एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, lj दुसरे त्यावर अग्रलेख लिहीणार, मग तिसरे दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र एकमेकांना भेटणार., मग कोणतरी दिल्लीला जातो, मग बातम्या येतात, पक्षश्रेष्ठींनी झापले. मग त्यावर पुन्हा दुसरे अग्रलेख लिहीतात. त्यानंतर रुसवे फुगवे दिसतात, मग बाईट, मग प्रतीबाईट.. अशी सगळी स्वबळाची छमछम सोडली तर राज्यात दुसरे काहीच ऐकायला येत नाही. यात जर दुसरे काही ऐकू येत असेल तर ती लेडीज बारची छमछम ऐकू येते आणि हे मीडियानेच काल उघड केल्याचे शेलार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
उच्च शिक्षणातील प्रश्नही प्रलंबित असून प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे प्रश्न आहेत. वेतनेतर अनुदानाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर प्राध्यापकांचे शासनास्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे सगळे प्रश्न कधी सुटणार, कोण चर्चा करणार हे काहीच माहिती नसल्याचे सांगत शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

राज्यात महिलांवरील अत्याचार वाढला असून गुन्हेगारीने कळस गाठला आहे, असे सांगतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोण सांभाळणार हे माहिती नाही,असे शेलार पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

‘ठाकरे सरकारने ठरवून दिलेली ही दिनचर्या आहे’

ठाकरे सरकार रोज सकाळी उठते आणि हे सरकार पाच वर्षे टिकणार असा जप करते. हा जप सर्व मंत्री १०८ वेळा करत असतात, अशा शब्दात सरकारची खिल्ली उडवतानाच बहुतेक ठाकरे सरकारनेही ठरवून दिलेली दिनचर्या असावी, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.ली दिनचर्या आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here