: कोकणात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिक चिंतेत आहेत. अशातच दापोली तालुक्यात बुधवारी २१ जुलै रोजी आघारी तिवरे रहाटेवाडी येथे समुद्रकिनारी अंदाजे ५० ते ६० वयोगटातील पुरुष जातीचे २ मृतदेह आढळून आले आहेत.
समुद्रकिनारी आढळलेल्या एका मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आलं आहे. सदर मृत व्यक्तीचे नाव राम गुलाब मोहिते (वय ६२) असं असून ते चिपळूण येथील गांधीनगरमधील वडार कॉलनीतील रहिवासी आहेत. दुसऱ्या मृतदेहाची अजूनही ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक श्री.जाधव, महसूल विभाग मंडळ अधिकारी श्री. गुरव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर व्यक्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times