ममता बॅनर्जींनी बुधवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. आपल्या समर्थकांना त्यांनी ऑनलाइन संबोधित केलं. यावेळी ममतांनी भाजपवर चौफेर हल्ला केला. तसंच राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संकेतही दिले. राजकीय पक्षांनी आपली संकुचित विचारसरणी सोडून एकजूट होण्याचं आवाहन ममतांनी यावेळी केलं.
आज आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे. भाजपने आपलं स्वातंत्र्य धोक्यात आणलं आहे. भापला आपल्याच मंत्र्यांवर विश्वास नाही आणि यंत्रणांचा दुरुपयोग करते. आमचे फोन टॅप केले जातात. पेगासस खतरनाक आणि क्रूर आहे. मी कोणाशी बोलूही शकत नाही. हेरगिरीसाठी पैसा ओतत आहेत. मी माझ्या फोनला प्लास्टर लावले आहे. आपण केंद्र सरकारवरही प्लास्टर लावले पाहिजे अन्यथा संपूर्ण देश उद्ध्वस्त होईल. भाजपने संघराज्य रचना ढासळली आहे, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times