दिब्रुगडः आसामच्या दिब्रुगडमध्ये एका महिला डॉक्टरला एकाच वेळी करोनाच्या दोन्ही वेरियंटचा संसर्ग ( ) झाला आहे. विशेष म्हणजे या महिला डॉक्टरने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. रिजनल मेडिकल रिसर्च सेंटर दिंब्रुगडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. जे. बोरकाकोटी यांनी ही माहिती दिली.

एकाच व्यक्तीला दुहेरी संसर्ग हा इतर मोनो-संसर्गासारखंच आहे. झाल्याने आजार गंभीर होईल, असं नाही. आम्ही रुग्णावर एक महिन्यापासून लक्ष ठेवून आहोत. त्यांची प्रकृती चांगली. चिंता करण्यासारखं कुठलंही कारण नाही, असं डॉ. बोरकाकोटी यांनी सांगितलं.

दुहेरी संसर्ग कसा होतो?

एका व्यक्तीला एकाचवेळी किंवा कमी कालावधीत दोन वेरियंटचा संसर्ग होतो, त्यावेळी दुहेरी संसर्ग होतो. संसर्गानंतर अँटीबॉडी तयार करण्यात २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. पण कधी-कधी याचदरम्यान दोन्ही वेरियंट अॅक्टिव्ह होऊन जातात. यापूर्वी असे रुग्ण ब्रिटन, ब्राझील आणि पोर्तुगालमध्ये समोर आले आहेत. हा भारतातील हा पहिला रुग्ण असू शकतो, डॉ. बोरकाकोटी म्हणाले.

महिला डॉक्टरच्या पतीला अल्फा वेरियंटचा संसर्ग होता. लिनीएज A ने संसर्ग झाला आणि लिनिएज B ने पुन्हा संसर्ग होणं हे सामान्य आहे. तसंच लिनिएज A+B चा संसर्ग एकाच वेळी होण्याचेही काही रुग्ण समोर आले आहेत, असं दिल्लीतील CSIR-IGIB चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं.

आसाममध्ये या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये दुसऱ्या लाटेत सुरवातीच्या काळात करोना संसर्ग झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये अल्फा वेरियंट आढळला होता. यानंतर एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर करोनाच्या डेल्टा वेरियंटचे रुग्ण आढळून आले होते. ईशान्येतील राज्यांमध्ये सध्या करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. सोमवारी १,७९७ नवीन रुग्ण आढळून आले. राज्यात १७,४५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here