पुणे: राज्यातील वाढते आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी इलेक्ट्रिक‍ गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली. ( )

वाचा:

फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातलं वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता सरकारने नवीन जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य मिळावे यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सरकारी व खासगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे वाढणारे दर त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक वाहने हाच पर्यावरणपूरक असा चांगला पर्याय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

वाचा:

काळाची पावलं ओळखून भविष्याचा वेध घेऊन फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांची वितरण सेवा सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑटो हब म्हणून ओळखली जाते. आता इलेक्ट्रिक वाहनांचे विक्री हब म्हणून नवीन ओळख पिंपरी -चिंचवड शहराला मिळेल. फिटवेल मोबिलिटीच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाडया या सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त असतील. प्रवासी व मालवाहतूक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण होईल. पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर इलेक्ट्रिक मोटारी प्रवासी व मालवाहतुकीसाठी एक चांगला, माफक, स्वच्छ व प्रदूषणमुक्त, फायद्याचा पर्याय आहे, असेही अजित पवार म्हणाले. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, फिटवेल मोबिलिटीचे रवींद्र कंग्राळकर उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here