नवी दिल्लीः करोना महामारीदरम्यान मृत्युंवरून ( ) आता राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष ( ) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर बुधवारी निशाणा साधला. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ( ) देशात ५० लाख भारतीयांचा मृत्यू झाला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशात करोना संसर्गाने आतापर्यंत ४.१८ लाखा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा सरकारने दिला आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे. ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट’चे एक संशोधन राहुल गांधी यांनी या ट्वीटमधून शेअर केले आहे. यात करोना महामारीच्या सुरवातीपासून ते जून २०२१ पर्यंत तीन वेगवेगळ्या डेटा स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या अधारावार मृत्यू दराचा अंदाज लावण्यात आला आहे. हे संशोधन राहुल गांधी शेअर केले आहे. ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारत सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशातील आपल्या ५० लाख बंधू, भगिनी, माता-पित्यांचा बळी घेतला आहे. हे सत्य आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांचा वारसांना केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली. ‘आपल्या जीवलगांना गमावणाऱ्यांच्या आश्रूंमध्ये सर्व नोंदलं गेलं आहे’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here