दिल्लीत जंतर-मंतरवर रोज २०० करतील. यासोबतच त्यांना करोनाच्या नियमांचे पालनही करावे लागणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शेतकऱ्यांना जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगी दिली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सिंघू सीमेवरून शेतकऱ्यांना जंतर-मंतर येथे आणलं जाईल, असं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महागाई, करोना महामारी आणि करोनाने होणारे मृत्यू अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता शेतकरी आंदोलनानेही त्यात भर पडणार आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
शेतकरी संघटनांच्या नेत्यांची दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी बैठक झाली होती. संसदेच्या अधिवेशना दरम्यान शेतकरी जंतर-मंतरवर शेतकऱ्यांची संसद भरवतील. हे आंदोलन शांततेत केले जाईल. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली जाईल. यादरम्यान, एकही आंदोलक संसदेत जाणार नाहीत, असं पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी सांगितलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times