राफेल लढाऊ विमानाची पहिली स्क्वॉड्रन हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर तैनात आहे. एका स्क्वॉड्रनमध्ये १८ लढाऊ विमानं असतात. हे तीन राफेल मिळाल्याने फ्रान्सकडून भारताला आतापर्यंत एकूण २४ विमानं दिली गेली आहे. दोन्ही देशांमधील करारानुसार फ्रान्सकडून भारताला ३६ राफेल विमानं मिळणार आहेत.
फ्रान्समधून उड्डाण गेतल्यानंतर या तीन विमानांनी ८ हजार किलोमीटरचे अंतर कुठेही न थांबता पूर्ण केलं. संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) हवाई दलाकडून हवेतच या तीन विमानांना इंधन उपलब्ध करून देण्यात आलं. याबद्दल भारतीय हवाई दलाने यूएईच्या हवाई दलाचे आभार मानले आहेत.
फ्रान्सकडून ५ राफेल लढाऊ विमानांची पहिली खेप २९ जुलै २०२० ला भारतात पोहोचली होती. आतापर्यंत एकूण २४ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. भारत आणि फ्रानमध्ये जवळपास ४ वर्षांपूर्वी ३६ राफेल लढाऊ विमानांच्या सौदा झाला होता. करारानुसार भारताने ५९,००० कोटींत ही ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा सौदा केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times