नवी दिल्लीः करोनाची दुसरी लाट टिपेला असताना ऑक्सिजनच्या कमतरतेने बिकट स्थिती निर्माण ( ) झाली होती. ऑक्सिजनच्या कमतरतेचा मोठा मुद्दा बनला होता. आता हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. कुठल्याही राज्यात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं राज्यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे, असं उत्तर केंद्र सरकारने संसदेत दिलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर सर्व राज्यांचे रेकॉर्ड आणि हायकोर्टात दिलेली प्रतिज्ञापत्र समोर मांडत या वादाला सत्ताधारी भाजपने ( ) फोडणी दिली आहे.

दोन राज्यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा दाखला दिला

महाराष्ट्र ( ) आणि दिल्ली सरकारने ( ) संबंधित हायकोर्टांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. यात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे, असं सांगत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. ऑक्सिजनच्या कमतरतेने किती मृत्यू झाले? हे राहुल गांधींनी आपल्या काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही विचारावं, असा टोला भाजपचे उपाध्यक्ष आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांनी लगावला आहे.

राज्यसभेत मंगळवारी केंद्र सरकारने दिलेले उत्तर योग्य आहे. आरोग्य हा राज्यांचा विषय आहे. केंद्र सरकार आपल्या स्तरावर कुठल्याही नोंदी करत नाही. राज्यांकडून ज्या नोंदी आणि अहवाल येतात, त्याचे संकलन केंद्र सरकार करते. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचं कुठल्याही राज्याने म्हटलेलं नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्र सरकार आणि राहुल गांधींनी यासंबंधी कुठलीच माहिती का दिली नाही? असा सवाल संबित पात्रा यांनी केला आहे.

‘राहुल गांधी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही?’

दिल्लीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २१ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. दिल्ली हायकोर्टाच्या अदेशावरून या प्रकरणी चौकशी करण्यात आली. पण अहवालात दिल्ली सरकारने रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारनेही मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असाच दावा केला आहे. मग राहुल गांधी दुटप्पी भूमिका का घेत आहेत? छत्तीसगडच्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये ७ मुलांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन अभावी मुलांचा मृत्यू झाल्याचं कुटुंबीय सांगत आहेत. तिथे काँग्रेसचं सरकार आहे. यामुळे राहुल गांधींनी आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणी उत्तर का मागत नाही? असा प्रश्न रमन सिंह यांनी केला.

विरोधी पक्ष या संवेदनशील मुद्द्यावरही राजकारण करत आहेत. केंद्र सरकारने दखल दिली तर आमच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला जातो. करोना रुग्णांच्या मृत्युचे आकडे हे राज्या सरकारे पाठवत आहेत. पण प्रश्न केंद्र सरकारला विचारले जात आहेत, असं म्हणत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here