काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती याला अटक करण्यात आली. राज कुंद्रा पॉर्न फिल्मची निर्मिती करत असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पॉर्न फिल्म तयार करून त्या नंतर अॅपवर अपलोड करत असल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानंतर आता यात शिल्पाचा सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पण या संपूर्ण प्रकरणात शिल्पा शेट्टीला नवऱ्यामुळे बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा याआधीही बऱ्याच वेळा वादाच्या भोवऱ्याच सापडला आहे.
निशा रावल
अलिकडच्या काळात म्हणजे महिन्याभरापूर्वीच अभिनेत्री निशा रावल सोशल मीडियावर चर्चेत आली होती. तिनं पती करण मेहरावर मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. याशिवाय करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही तिचं म्हणणं होतं.अर्थात करणनं हे सर्व आरोप नकारत निशा रावलवरच पलटवार केला होता.
जरीना वहाब
अभिनेत्री जरीना वहाबचा पती आदित्य पंचोली आणि वाद यांचं फार जुनं नातं आहे. पती आदित्य पंचोलीमुळे जरीनाही टिकेचा सामना करावा लागला आहे.
दिव्या कुमार खोसला
अभिनेत्री दिव्या कुमार खोसलाही आपल्या पतीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तिचा पती आणि टी- सीरिज हेड भूषण कुमारवर एका मॉडेलनं बलात्काराचा आरोप केला होता. अर्थात भूषण कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. पण यामुळे दिव्याला मात्र मनस्ताप झाला होता.
जेव्हा अभिनेत्री कंगना रणौत आणि बार्बरा मोरीसोबत हृतिक रोशनचं अफेअर असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर त्याची पत्नी सुझान खानला मोठा धक्का बसला होता. यानंतर या दोघांचा घटस्फोटही झाला.
मदालसा शर्मा
अभिनेत्री मदालसा शर्मा हे सध्या टीव्ही जगतात लोकप्रिय नाव आहे. पण आपल्या पतीमुळे मदालसालाही लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती उर्फ मिमोहवर एका अभिनेत्रीनं ३ वर्षं बलात्कार केल्याचा आरोप लावला होता. पण नंतर अभिनेत्या हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times