नाशिक : नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण झाला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशाच नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरी नदीला रात्रीच्या पावसाने पूर आल्याचं समोर आलं आहे. दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून जलाशयातील पाणीसाठा आज सकाळी ७५% पर्यंत पोहोचला. त्यामुळे धरणातून ५५० क्यूसेकने विसर्ग सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पाऊस सुरूच राहिल्यास व पाणीसाठ्यात आणखी वाढ झाल्यास दारणा जलाशयातून आणखी विसर्ग करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विक्रमी ९३५ मिलीमीटर पाऊस झाला. पेठमध्ये अतिवृष्टी झाली इथे ३१५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इगतपुरीत २४०, त्रम्बकेश्वर येथे २१६ मिमी पाऊस झाला आहे. सुरगाण्यातही ४५ मिलीमीटर पावसाची नोंद तर जुलै महिन्याच्या सरासरीच्या ६५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे धरणाचं पाणी न सोडताच नाल्याचं पाणी शहरांत शिरल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गोदाघाटावर मोठ्या प्रमाणात नाल्याचे पाणी साचल्यामुळे नजीकच्या गावांनाही पालिकेने इशारा दिला आहे. खरंतर, महापालिकेने नालेसफाईचे काम न केल्याने तीन तेरा वाजले आहेत.

नाशिक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत तुफान पाऊस कोसळत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले असून त्र्यंबकेश्वर मंदिरातही सध्या पाणी असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे सूरगाणा तालुक्यातही नदी नाले दुथडी भरून वाहत असून झगडपाडा गावाजवळ असलेल्या शिवनदी पुलावर पाणी आल्याने डझनभर गावांचा संपर्क तुटला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here