सोनभद्रमध्ये सोन्याचा शोध अजून सुरू आहे. जीएसआयचा सर्व्हे अजूनही सुरू आहे. तिथे आणखी सोनं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या जे अशुद्ध सोनं आढळलंय त्यातून १६० किलो शुद्ध सोन निघेल. युएनएफसी मानक असलेल्या जी-३ पातळीवरील तपासाचा अहवाल जीएसआयने उत्तर प्रदेश भूविज्ञान व खाण संचालनालयाला पाठवला आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली.
सोनभद्रच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितला अहवाल
सोनभद्रच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भूमी संबंधी अहवाल मागवण्यात आला आहे. यानंतर ह्या भागावर भू-राजस्व मानचित्र अंकित करून उत्खननासाठी उपयुक्त क्षेत्र असल्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल. त्यानंतर लिलाव केला जाईल, असं तिवाही म्हणाले. सोनभद्र जिल्ह्यातील सोन आणि हरदी या दोन पहाडीत सापडल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times