म. टा. प्रतिनधी । पिंपरी

भांबोली येथील चाकण रस्त्यावर असलेल्या एटीएममध्ये स्फोट घडवून घालण्यात आलेल्या दरोड्यानंतर पोलिसांनी हिताची पेमेंट सर्व्हिसेस कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. एटीएमच्या सुरक्षेत हयगय केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Case against Hitachi Company after in )

दोन अज्ञात इसमांनी काल पहाटे एटीएममध्ये स्फोट घडवून आणला. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारी राहणारे सोमनाथ सोपान पिंपज त्या दिशेने धावले असता आरोपींनी त्यांना पिस्तूल धाक दाखवला व मशिनमधील २८ लाख ७७ हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात इसमांसह कंपनी व त्यांची फ्रेंचायजी कंपनी प्रॉपर्टी डेस्कवर गुन्हा दाखल केला आहे. सागर दांगट असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या माणसाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस नाईक हनुमंत जयराम कांबळे यांनी ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाचा:

कंपनीने सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला आहे. कंपनीने एटीएम सेंटरमध्ये सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केली नव्हती. सुरक्षारक्षक, सुक्युरिटी अलार्म, सीसीटीव्ही कॅमेरे यापैकी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नव्हती. एवढी मोठी रक्कम मशिनमध्ये ठेवत असताना सुरक्षेच्या उपाययोजनांकडे कंपनीने का दुर्लक्ष केले, हा मोठा प्रश्न आहे. कंपनीने या उपाययोजना केल्या असत्या तर हा प्रकार टाळता आला असता. तसेच याबाबत सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी कंपनीला नोटीस बजावली होती. त्याकडेही कंपनीने दुर्लक्ष केले, असे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरविंद पवार यांनी सांगितले.

स्फोटकासाठी नक्की कशाचा वापर

चोरट्यांनी स्फोट घडवून आणण्यासाठी जिलेटिनच्या कांड्यांचा वापर केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, डिटोनेटर कोणता वापरला व आणखी कोणत्या साहित्याचा वापर केला आहे का, हे तपासण्यासाठी संबंधित नमुने लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.

यूपी, एमपीमधील एटीएम स्फोटाशी साम्य

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये एटीएम सेंटरमध्ये स्फोट घडवून मशिनमधील पैसे चोरण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणच्या पोलिसांशी संपर्क करून याबाबत माहिती घेतली. मात्र, स्फोट करून एटीएम मशिन उडविणाऱ्या टोळ्या तुरुंगात असल्याचे समजले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here