महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्ट पासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील असा, इशारा केशव उपाध्ये यांनी दिला आहे.
वाचाः
मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत. सामान्य माणसाला उपनगरी प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असताना राज्य सरकार सामान्य माणसाला उपनगरी रेल्वे प्रवासास परवानगी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. टाळेबंदीबाबतच्या राज्य सरकारच्या धरसोडपणामुळे जनतेचे जगणे अगोदरच मुश्कील झाले आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
सामान्य माणसाला लोकल प्रवासास परवानगी द्या अन्यथा प्रवास खर्चापोटी पाच हजार रु. भत्ता द्या या भाजपाने केलेल्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. वैतागलेला सामान्य माणूस आघाडी सरकारच्या निषेधार्थ मोफत लोकल प्रवास करून सविनय नियमभंग आंदोलन करेल, असा इशारा केशव उपाध्ये यांनी दिला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times