चिपळूणमधील वाशिष्टी नदीत मगरींचे प्रमाण खूप असल्याने पुरासोबत या मगरी काही ठिकाणी लोकांच्या घरात मुक्त वावर करत असल्याने चिंतेत भर पडली आहे. तसंच साप आणि खेडकेही घरात आढळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अनेकांचे संसार उद्धवस्त; चिपळूणमध्ये काय आहे स्थिती?
चिपळूण तालुक्यातील महापूरस्थितीमुळे हाहाकार उडाला आहे. नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. अनेकाचे संसार पावसाने होत्याचे नव्हते केले आहेत. केवळ पुराचे पाणी नव्हे तर साप, मगरी सुद्धा पाण्यातून येत असून नागरिकांचे जीव संकटात अडकले आहेत. मदतीसाठी नागरिक धावा करत आहेत, मात्र संपर्काआभावी मदतकार्यात अडथळे येत आहेत. अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. खेड शहरातही ही पूरस्थिती कायम आहे.
कोळकेवाडी धरणातून पहाटे ४ वाजता विसर्ग केल्याने अचानक चिपळूण शहर आणि परिसरात पाणी वाढले. सकाळपर्यंत या पाणी पातळीत वाढ झाली आणि महापुराची परिस्थिती निर्माण झाली. ५ हजार पेक्षा जास्त माणसे पुरात अडकल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. संपर्क तुटला असून लोकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.
दरम्यान, गुरुवारी दुपारनंतरही पुराचे पाणी सातत्याने वाढत असून संकटात वाढ होत असल्याचं चित्र आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times