मुंबई: माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘फडणवीस यांना आगामी काळातही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी,’ अशी सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Chandrakant Patil Greets )

वाचा:

पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला सुख देण्यासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले,’ असं पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री यांनाही पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. राजकारणातील परखड माणूस अशा शब्दांत त्यांनी अजितदादांचा गौरव केला. ‘नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदा होर्डिंग्ज लावून नेत्यांना अडचणीत आणू नका आणि आचारसंहिता पाळा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईचंही त्यांनी समर्थन केलं.

मी अजित पवारांशी सहमत आहे – पाटील

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असलेल्या निर्बंधांवरून त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. ‘करोनाच्या भीतीमुळं अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल त्यांनी केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारनं दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ‘अजित पवार आणि राजेश टोपे यांच्याप्रमाणंच माझंही मत आहे. मी ते आधीपासूनच व्यक्त केलं आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी व्यवहार खुले करावेत. जनजीवन बंद ठेवून चालणार नाही, परिस्थितीला सामोरं जावं लागेलच,’ असं ते म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here