नवी दिल्लीः दहशतवादी आणि भ्रष्टाचाऱ्यांना प्रायव्हसीचा (व्यक्तिगत गोपनीयता) मूलभूत अधिकार नाहीए. त्यांना इंटरनेटचा दुरुपयोग करू देऊ नये, असं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले. आंतरराष्ट्रीय न्यायीक संमेलन-२०२० मध्ये ‘न्यायपालिका आणि बदलते जग’ या परिसंवादात ते बोलत होते. मानवाने बनवलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा जे दुरुपयोग करतात त्यांच्यापासून सर्वाधिक धोके असतात. त्यात इंटरनेटचाही समावेश आहे, असं प्रसाद यांनी सांगितलं.

‘प्रायव्हसीला मूलभूत अधिकार मानलं गेलंय. सरकारही ते स्वीकार करतंय. पण दहशतवादी आणि भ्रष्टाचाऱ्यांसाठी प्रायव्हसीचा मूलभूत अधिकार नाहीए. कारण प्रायव्हसीच्या अधिकाराला डिजिटल साथ मिळाली तर जागतिक पातळीवर त्याला मोठं स्वरुप येतं. हे माहितीचं युग आहे आणि माहिती ही शक्ती आहे’, असं रविशंकर प्रसाद म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा प्रायव्हसीसंदर्भातला निर्णय हा जागासाठी मार्गदर्शक ठरला आहे. कारण घटनेच्या कलम २१नुसार प्रायव्हसीचा अधिकार आहे, असं कोर्टाने निर्णयात म्हटलंय.

कोर्टाने आपल्या मागण्यांप्रमाणे निर्णय दिला तर त्यावरून जोरदार टीका करण्याची काहींची प्रवृत्ती आहे. लोकशाहीत असहमतीचं स्वागतच आहे, असं प्रसाद म्हणाले. घटनेनुसार निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर सरकारची जबाबदारी सोपवली गेली पाहिजे. त्यांना संसद आणि इतर न्यायीक निर्णयांसंबंधी जबाबदार होण्याची गरज आहे, असं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here