मुंबई : महारेरा’चे अध्यक्ष आणि राज्याची मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या फ्लॅट खरेदीच्या प्रकरणाला आता नवं वळण लागले आहे. मेहता यांना ज्या व्यक्तीने फ्लॅट विकला तो व्यक्ती बनावट कंपन्यांमध्ये (शेल कंपन्या) संचालक असल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे. ही व्यक्त आता ईडीच्या रडारवर असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. तसेच या व्यक्तीचा संबंध पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरशी असल्याचे तपासात आढळून आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांनी नरिमन पॉईंट भागात तब्बल ५.३ कोटी रुपयांना एक फ्लॅट विकत घेतला होता. मात्र हा बेनामी व्यवहार झाल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला असून या व्यवहाराची कसून चौकशी केली जात आहे.

मेहता यांनी समता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर १,०७६ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला फ्लॅट विकत घेतला आहे. मेहता यांना निखिल केतन गोखने या व्यक्तीने फ्लॅट विक्री केला आहे. गोखले हा अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक असल्याचे तपासात समोर आले आहे.

गोखले एक दोन नव्हे तर तब्बल सात कंपन्यांमध्ये संचालक आहे. या कंपन्या पुण्याचे प्रसिद्ध बिल्डरच्या ‘एबीआयएल’ समूहाशी संबंधित आहेत. मनी लाॅडरिंग कायद्याअंतर्गत यापूर्वीच ”कडून या बिल्डरची चौकशी केली जात आहे. गेल्या महिन्यात ईडीने या बिल्डरची ४० कोटींची संपत्ती जप्त केली होती.

रजिस्टार ऑफ कंपनीजच्या डिसेंबर २०२० पर्यंतच्या रेकॉर्डनुसार अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये निखिल केतन गोखले याची ऑक्टोबर २००८ मध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्याने यावेळी एबीआयएल कंपनीचा ई-मेल आयडी पुरवला आहे. त्यामुळे ईडीचा संशय बळावला आहे. याबाबत ‘दि इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात गोखले यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडशी कोणताही संबंध नाही, असा दावा गोखले यांनी केला आहे.

बेनामी व्यवहार विभागाला अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅलन्सशीटमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.या फ्लॅटसाठी बोगस कंपनीची स्थापन करून बेनामी व्यवहार करण्यात आल्याचे इन्कम टॅक्स विभागाच्या बेनामी संपत्ती शाखेच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून देखील या प्रकरणी चौकशी केली जात आहे.

हा तर कायदेशीर व्यवहार , अजोय मेहतांचा दावा समता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅट हा बाजार मूल्यानुसार कायदेशीर मार्गाने खरेदी केला असल्याचा दावा अजोय मेहता यांनी केला आहे. मी एक करदाता आहे. मी फ्लॅट खरेदीसाठी केलेलं पेमेंट नियमानुसार केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here