रत्नागिरी: राज्यातील विविध भागांत तुफान पावसामुळे पूरसंकट कोसळलं असून कोकणला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. आणि रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. एकीकडे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे तर दुसरीकडे कोकण रेल्वेलाही ब्रेक लागला असून प्रवाशांचीही मोठी कोंडी झाली आहे. ( )

वाचा:

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्टेशन्सवर सुमारे ६ हजार प्रवासी अडकले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणार असून तोपर्यंत या प्रवाशांची रखडपट्टी होणार आहे. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

वाचा:

दरम्यान, नदीपूल येथे पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे आणि कामथे स्टेशन दरम्यानचा भाग रेल्वे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येत असल्याचे कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. ट्रेन क्र. ०६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवअनंतपुरम ही गाडी सकाळी ११.४० ऐवजी सायंकाळी ४.४० वाजता रवाना झाली आहे. ०१११२ मडगाव-मुंबई सीएसएमटी ही विशेष ट्रेन सायंकाळी ४.४५ ऐवजी एक तास उशिराने ४.४५ वाजता रवाना झाली आहे. ट्रेन क्र. ०२६१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरू ही गाडी ३.२० च्या ऐवजी ६.३० वाजता रवाना होणार आहे. गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे नमूद करत रेल्वेने सहकार्य करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.

महत्त्वाचे अपडेट्स…

– चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला पूर आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
– मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी करावी लागली रद्द.
– तेजस एक्स्प्रेसही रद्द. अनेक लांब पल्याच्या गाड्यांचे मार्ग बदल्यात आले.
– सकाळी नेत्रावती एक्स्प्रेस व मांडवी स्पेशल ट्रेन निर्धारित वेळेत मुबईकडे रवाना.
– मडगाव-मुंबई सीएसएमटी विशेष ट्रेनची वेळ बदलली.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here