मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ७ हजार ३०२ नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ७ हजार ७५६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 7392 new cases in a day with 7756 patients recovered and 120 deaths today)

आजच्या १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार १६८ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ८६९ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण ११ हजार ७१० इतके रुग्ण आहेत. तर, सांगलीत ही संख्या १० हजार ७३७ इतकी आहे. कोल्हापुरात ही संख्या १० हजार ७०१ इतकी आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या १० हजार ३०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. साताऱ्यात ही संख्या ७ हजार २१०, अहमदनगरमध्ये ३ हजार ७३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये २ हजार ५६०, रत्नागिरीत २ हजार ६१०, सिंधुदुर्गात २ हजार २७०, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १५९ इतकी आहे. तर, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ६९२ इतकी झाली आहे.

यवतमाळमध्ये फक्त १८ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६९४, नांदेडमध्ये ही संख्या ४४२ इतकी आहे. जळगावमध्ये ४६६, तसेच अमरावतीत ही संख्या १२९ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १८ इतकी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here