मुंबई: मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केल्यानंतर आता तब्बल २३ तासांनंतर मुंबईत लोकल सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कसारा/कर्जत लोकलसेवा रात्री ९ वाजल्यापासून पूर्ववत करण्यात आली आहे. ( after 23 hours )
सध्या सीएसएमटी ते खोपोली आणि मुंबई-पुणे घाटमार्ग बंद आहे. हा घाटमार्ग रात्री उशिरापर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times